वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे भूम तालुक्यातील ५ शेतकऱ्यांना सात गाईंचे वाटप
भूम (सा.संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, जिल्हा पुणे या सामाजिक संस्थेतर्फे वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर भूम तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना सात गाईंचे वाटप करण्यात आले.
अलीकडील पूरपरिस्थितीमुळे चिंचपूर ढगे आणि पिंपळगाव (ता. भूम) परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः, काहींचे पशुधन वाहून गेल्याने किंवा मृत्यूमुखी पडल्याने त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला होता. अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या सामाजिक संस्थेने हा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमाअंतर्गत विश्वनाथ दातखिळे (पिंपळगाव),अमोल विश्वनाथ ढगे, विक्रम तांबे,ॲड.सुरेश ठोंबरे, समाधान ढगे या शेतकऱ्यांना गोधनाचे वाटप करण्यात आले. वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी गोपूजन करून मान्यवरांच्या हस्ते गोधन स्वीकारले.
कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने चंद्रकांत तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश मातने यांनी केले.
या प्रसंगी श्री किर्तेश्वर संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प.नरेंद्रगिरी महाराज,सरपंच मधुकर सांगळे उपसरपंच सुधीर ढगे,सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे कृणाल काळे,श्रमिक गोजमगुंडे,रमेश वामन,सागर माने, गौरव शेवाळे,कैला
स ओव्हाळकर, ऋषिकेश गुजर, ऋषिकेश कंदलकर, आदित्य कोठावळे आणि सार्थक पांढरगामे उपस्थित होते.
या कार्यक्रमास चिंचपूर ढगे परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांना उत्साहाने पाठबळ दिले.
चौकट
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यावतीने दिले गेलेल्या गाई कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या मध्यस्थीने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या समन्वयातून पशुपालकांना मिळाल्या असून या सामाजिक उपक्रमामुळे शेतकरी आणि पशुपालक वर्गाला खऱ्या अर्थाने आधार मिळाला असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.